पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला १५४ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. आज जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढून १५४ वर पोहचली आहे. तर १५४ पैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे.

 पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. आज जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढून १५४ वर पोहचली आहे. तर १५४ पैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण १५४ कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी पालघर त्यालुक्यतले १६ रुग्ण असून १ जणाचा मृत्यू झाला आहे. डहाणु तालुक्यात ८ रुग्ण आहेत. तर उर्वरित १२९ रुग्ण हे वसई विरार क्षेत्रातले असून ८ जणांचा मृत्यूू झाला आहे.  

जिल्ह्यात ४८६७ प्रवाश्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. परदेशातुन आलेल्या १२५३ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. २८२० जणांचे घश्याचे नमुने तपासणीसाठी मुबंईला पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी २४२३ जणांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आलेत तर २४३ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.