पालघरमधील आणखी एक नर्स कोरोनाबाधित, जिल्ह्यात २२९ रुग्ण

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज दुपारी मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात २२९ इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

 पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज दुपारी मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात २२९ इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आजारातून बऱ्या झालेल्या १२३ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे सर्वात जास्त २०० रुग्ण हे वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

काल दुपारपासून आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पालघरमध्ये आज आणखीन एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला पालघरच्या पूर्व भागातली रहिवासी आहे. ती मुंबईच्या के.ई. एम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. या नर्स महिलेची मुंबईमध्ये कोरोना चाचणी केली असता तिच्या तपासणी अहवालातून ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या अगोदर ही पालघरमधल्या मुंबईला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली होती.