पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५३ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या कोरोना

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून  आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या २५३ वर पोहचली आहे. तर २५३ पैकी ११ जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण २५३ कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी पालघर तालुक्यातले १८ रुग्ण असून १ जणाचा मृत्यु झाला आहे. डहाणु तालुक्यात ९ रुग्ण आहेत. वसई ग्रामीण मध्ये २ रुग्ण असून १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित २२४ रुग्ण हे वसई विरार क्षेत्रातले असून इथे ९ जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातल्या २३७ जणांचे तपासणी अहवाल येने बाकी आहेत. तर बऱ्या झालेल्या १३२ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे.