पालघर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ७५ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून आता ती वाढून ७५ वर पोहचली

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून आता ती वाढून ७५ वर पोहचली आहे. आज  संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार आज दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत ६ नव्या कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७५ पैकी ५ जणांचा मृत्यु झाला आहे. यात पालघर तालुक्यातले १० रुग्ण असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर ३ हे डहाणू तालुक्यातले आहेत. वसई  विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या ६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातल्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात १८१६ प्रवाश्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यातल्या ४७८  जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच ११४६ जणांच्या घश्यांचे नुमने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले होते. त्यातल्या ५२७ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर अजून ५४४ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.