पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५ नव्या रुग्णांची नोंद ;जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ३२८ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता

 पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ३२८ वर पोहचली आहे. तर ३२८ पैकी आतापर्यंत १६ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सर्वात जास्त २८९ इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ पालघर तालुक्यात २१ रुग्ण आहेत. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डहाणू तालुक्यात १० , वाडा तालुक्यात ३ आणि वसई ग्रामीण भागात ५ कोरोनाचे रुग्णआहेत. त्यापैकी १ जणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूच्या आजारातून बऱ्या झालेल्या १७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.