पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३९२ नव्या रुग्णांची भर ; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ४९८२ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३९२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता

  पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३९२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ४९८२ वर पोहोचली असून आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३२७५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सर्वात जास्त कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातली असून ती ३९१७ इतकी आहे. तिथे आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पालघर ग्रामीण भागात सद्यस्थितीत २४५ इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.