दरोडे टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, ४ आरोपी अटकेत – पालघर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पालघर : घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडे टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तर यात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने २०१९

 पालघर : घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडे टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तर यात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेला असलेल्या एका युनायटेड पेट्रो फायनान्स या गोल्ड फायनान्सच्या ऑफिसमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. तर २०१३ मध्ये नालासोपारा पूर्वेकडच्या अक्सिक्स बँकेत झालेल्या दरोड्यात ही यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.अटकेत असलेले आरोपी आणि त्यांचे साथीदार यांच्या विरुद्ध खून , दरोडे, चोरी, अशा स्वरूपाचे गुन्हे केवळ महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई, ठाणे, पालघर इथेच नव्हे तर गुजरात आणि कर्नाटक राज्यात ही अनेक गुन्हे दाखल आहेत.

 पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडे२०१९ मध्ये  सेंट्रल पार्क इथं या टोळीतल्या ६ आरोपींनी युनायटेड पेट्रो.फायनान्स या गोल्ड फायनान्सच्या ऑफिस मध्ये शस्त्रांसह जावून सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून  दरोडा टाकला होता. आणि १,७६,८७,१३५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेवून हे दरोडेखोर लंपास झाले होते. त्याविषयीची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात या आरोपीं विरुद्ध कलम ३९५, ४२७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस निरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई निकेत कौशिक आणि पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे , वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पालघरचे अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, ,अमोल मांडवे, उप विभागीय पोलीस अधिकारी नालासोपारा विभाग, रवींद्र नाईक यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं २ टीम तयार करून वसई युनिटचे सहा.पो.निरी सुहास कांबळे आणि संतोष गुर्जर यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी तात्काळ वसई युनिट मधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देवून  मुंबई ला योग्य पध्दतीनं सापळा रचून या टोळीतल्या ४ आरोपींना ४ जून ला अटक केली. पोलीस तपासात या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस तपासात त्यांच्याकडून सोन्याचे दागिने विकून आलेली रक्कम,सोन्याचे दागिने, १ रिव्हॉल्वर, १ पिस्टल, ८ जिवंत काडतुसे, १ इनोव्हा कार, १ रिक्षा असा एकूण ३९,७१,६०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तपासात आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी २०१३ मध्ये नालासोपाऱ्यात अॅक्सिक्स बँकेत झालेल्या दरोड्यात यांचा सहभाग असल्याचं ही निष्पन्न झालं आहे. अॅक्सिक्स बँकेतून तीन करोड सत्याऐंशी लाख पन्नास हजार इतकी रक्कम चोरीस गेली होती. या आरोपींना ५ जूनला वसई न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं यांना १४ जून र्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. या दरोड्यातल्या आरोपींना पकडण्यासाठी योगदान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्रही दिलं जाणार असल्याची माहिती पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या गुन्ह्यातल्या उर्वरित आरोपींचा  शोध सुरू असून पुढील तपास नालासोपारा विभागाचे उप. विभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे हे करीत आहेत.