निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित होणाऱ्या गावातल्या नागरिकांचे स्थलांतरण निवारा छावण्यांमध्ये होणार

पालघर : निसर्ग चक्रीवादळाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातल्या समुद्रकाठी असलेल्या चक्रीवादळामुळे बाधित होणाऱ्या गावांमधल्या बाधित नागरिकांचे स्थलांतरण निवारा

 पालघर :  निसर्ग चक्रीवादळाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातल्या समुद्रकाठी असलेल्या चक्रीवादळामुळे बाधित होणाऱ्या गावांमधल्या बाधित नागरिकांचे स्थलांतरण निवारा छावण्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे पालघर जिल्हयातल्या समुद्र किनारपट्टी भागातल्या पालघर, वसई, डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये ३ जूनला हानी पोहोचण्याची शक्यता असून अतिवृष्टीचा इशारादेखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे निवारा छावणीत निवारा देण्यात आलेल्या नागरिकांना  छावण्यात पिण्याचे पाणी, अन्न, स्वच्छता आणि आरोग्य सेवा तसेच औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे . या सुविधा सुरळीतपणे देण्यासाठी आणि सर्व गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली आहे.