पालघर जिल्ह्यात आज आढळले १० नवे कोरोना रुग्ण, रुग्णांची संख्या ४३४ वर

पालघर : आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आज १० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यातल्या सारणी, डहाणू , वाणगाव इथले प्रत्येकी एक असे ३ रुग्ण , पालघर

पालघर : आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आज १० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यातल्या सारणी, डहाणू , वाणगाव इथले प्रत्येकी एक असे ३ रुग्ण , पालघर तालुक्यातल्या बोईसरच्या काटकरपाडा , बोईसर , तारापूर इथले प्रत्येकी १ असे ३ रुग्ण आणि वसई तालुक्यातल्या अर्नाळा, वसई इथले प्रत्येकी दोनप्रमाणे ४ रुग्ण असे आज एकूण १० नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत.पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या सारणी इथं राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या तरुणाचा कोलकाता इथला प्रवासाचा इतिहास असल्यानं त्याची कोरोना चाचणी केली असता तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर डहाणू इथं राहणाऱ्या एका १८ वर्षीय देखील कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे त्याच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. हा तरुण ओडिसा इथून डहाणूत स्थलांतर करून आला असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 

तसेच डहाणू तालुक्यातल्या वाणगाव च्या कोमपाडा इथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही महिला डहाणू इथं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं या सेविकेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आज डहाणू तालुक्यात ३ कोरोना रुग्ण एकदम आढळून आलेत. पालघर तालुक्यातल्या बोईसरच्या काटकरपाडा इथं राहणाऱ्या एका ५ वर्षीय चिमुकल्याला ही कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे त्याच्या चाचणीतुन निष्पन्न झालं आहे. लक्षणे आढळल्याने त्याची कोरोना चाचणी केली गेली. ज्यात याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर याच  बोईसर इथं राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला देखील कोरोनाची लक्षणे दिसून येवू लागल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. तसेच बोईसरच्या तारापूरमध्ये राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तीला ही कोरोना विषाणूची लागण झाली. त्याचा लंडन इथला प्रवासाचा इतिहास आहे. असे आज पालघर तालुक्यात ३ नवे रुग्ण आढळून आलेत. तर वसई तालुक्यातल्या वाळसई इथं राहणाऱ्या एकाचं कुटुंबातल्या एक ८६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आणि ८० वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. रुग्ण क्रमांक ३८ च्या संपर्कात आल्यानं ह्या दोन्ही वृद्धांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले. तसचं अर्नाळा इथल्या एका ३५ वर्षीय आणि एका ३२ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या दोन्ही महिला रुग्ण क्रमांक ४४ च्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली गेली.त्यात त्या पॉझिटिव्ह आढळल्या. आज वसई तालुक्यात ४ नवे रुग्ण दुपारपर्यंत आढळून आलेत.

आज १० नव्याने आढळून आलेल्या बऱ्याच रुग्णांचा बाहेरच्या प्रवासाचा इतिहास आहे. तर बरेच रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानं त्यांना ही लागण झाली. यायचं अर्थ बाधित लोकांमध्ये उशिरानं कोरोनाची लक्षणं दिसून येत आहेत. असं असल्यास जिल्ह्यात वेगानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातल्या ज्या ज्या भागांत हे रुग्ण आढळून येत आहेत तिथं लोकांना कोरोना आजाराचं गांभीर्यचं नसल्याचं चित्र दिसून येत आहे. नागरिक या न त्या कारणासाठी घराबाहेर पडताना दिसतायेत तर नको तेवढी अनेक ठिकाणी गर्दी ही करताना दिसून येतायेत. आज दुपार पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४३४ वर पोहचली आहे. त्यापैकी १८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर बऱ्या झालेल्या २३४जणांना घरी सोडण्यात आलं आहे.  जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण संख्या ही वसई विरार क्षेत्रात  ३७४ इतकी आहे.त्यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात २४ रुग्ण असून २ जणांचा मृत्यू झालाय.डहाणू तालुक्यात १५ तर वाडा तालुक्यात ३ रुग्ण आहेत. तसचं वसई ग्रामीणमध्ये १८ रुग्ण असून १ जणाचा मृत्यू झाला आहे.