पालघर जिल्ह्यात फिव्हर क्लिनिकला सुरुवात

पालघर : देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. त्याच बरोबर पालघर जिल्ह्यातदेखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनेची अंमलबजावणी करत आहे.

पालघर : देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. त्याच बरोबर पालघर जिल्ह्यातदेखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनेची अंमलबजावणी करत आहे. व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर जी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात, जसं ताप खोकला, सर्दी, अशा लक्षणांचं निदान करून त्यावर उपचार करणं आवश्यक असल्यानं जिल्ह्यातल्या विविध भागात फिव्हर क्लिनिक स्थापन करण्यात आली आहेत.   या माध्यमातून जिल्ह्यातल्या विविध भागातल्या रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे.

सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे ज्या रुग्णांमध्ये तीव्र प्रमाणात जाणवत असतील अशा रुग्णांच्या घशातले नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या उपाययोजनेच्या माध्यमातून कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. यामुळे इतर सामान्य आरोग्य असणाऱ्या नागरिकांपर्यंत पसरणारा कोरोना विषाणूचा संसंर्ग आपण रोखू शकणार आहोत, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 
जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली फिव्हर क्लिनिक : मुलांचे वसतीगृह जव्हार,  मुलींचे वसतीगृह जव्हार,भारती विद्यापीठ ,उधवा आश्रमशाळा तलासरी,संतोषी आश्रमशाळा डहाणू,साखरे आश्रमशाळा विक्रमगड, साजन रिसॉर्ट विक्रमगड,आय.टी.आय मोखाडा, आयडीयल वसतिगृह वाडा,साईबाबा हौसिंग कॉलनी, पाणेरी माहीम रोड पालघर, तहसीलदार कार्यालय मोखाडा,नंडोरे आश्रमशाळा पालघर, रेवेरा वसतिगृह, विक्रमगड, जीवन विकास विद्यालय पालघर,
तवा आश्रमशाळा तवा, मुकबधीर विद्यालय जव्हार, पाली आश्रमशाळा वाडा, आय. टी. आय विक्रमगड ,वेदांत संस्था वैद्यकीय महाविद्यालय द्वितीय,
दयानंद हॉस्पिटल तलासरी ,आयडियल रुग्णालय वाडा,  ग्रामीण रुग्णालय पालघर, ट्रॉमा केअर सेंटर डहाणू ,