दुसऱ्या जिल्ह्यातून पालघरमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करावे- जिल्हाधिकारी

वाडा: दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशी असलेले परंतु त्यांची सेवा पालघर या मुख्यालयी असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात ये -जा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.

वाडा: दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशी असलेले परंतु त्यांची सेवा पालघर या मुख्यालयी असलेल्या  अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात ये -जा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले. शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबणे आवश्यक आहे. पालघर जिल्हयामध्ये काम करणारे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे  मुख्यालयामध्ये न थांबता जिल्हयाबाहेरून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक जिल्हयातून त्याचबरोबर जिल्हयातील वेगवेगळया भागामधून ये-जा करत आहेत. तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक जिल्हयाचे ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी हे पालघर जिल्हयात विविध ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर बाहेरील जिल्हयामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी,  कर्मचारी हे पालघर जिल्हयामध्ये वास्तव्य करीत आहेत.कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालघर जिल्हयामध्ये कार्यरत असलेले विविध विभागाचे अधिकारी,  कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयामध्ये वास्तव्य करावे व त्यांनी जिल्हयाबाहेरील त्यांच्या  निवासाच्या ठिकाणी ये-जा करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले तसेच त्यांच्या कामाच्या ठिकाणी वास्तव्य करावे. त्यांनी कामाच्या ठिकाणाहून पालघर जिल्हयामध्ये ये-जा करू नये. अशा ये जा करणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्हयातील कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या निर्देशाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी  पालन करावे.  या आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतूदीनूसार संबंधीतांवर दंडनीय/ कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.