निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क ;एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात

पालघर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा फटका इतर काही जिल्ह्याप्रमाणे ३ जूनला पालघर जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे

पालघर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा फटका इतर काही जिल्ह्याप्रमाणे ३ जूनला पालघर जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्या लगतच्या वसई, पालघर आणि डहाणू या ३ तालुक्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पालघर आणि डहाणू तालुक्यात पुण्याहुन प्रत्येकी  १ -१ एनडीआरएफच्या टीम ला तर वसई तालुक्यात एसडीआरएफच्या टीमना तैनात करण्यात आले आहे.

पालघर तालुक्यात पुण्याहून २० जणांची एक एनडीआरएफची टीम इन्स्पेक्टर अरखीत जैना यांच्या नेतृत्वाखाली तैनात असून ही टीम सर्वत्र पाहणी करत आहे. वसई तालुक्यातल्या १२ ग्रामपंचायतींना आणि  महापालिकेतल्या पाचू बंदर, ससुनवघर, यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकूण २९ ठिकाणी शाळांमध्ये बाधितांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्यात. वसई-विरार च्या किनारपट्टीला असणाऱ्या अर्नाळा, कळंब,राजोडी पाचुबंदर ससुनवघर, कामण,या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना परिसरातल्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.