पालघरमधील एका कंपनीला आग

वाडा: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील नेटाली भागात अरिहंत नामक कंपनीला आज दुपारी २.४५ सुमारास आग लागली आहे. कंपनीत वॉटर पार्कमध्ये लागणारी फायबर स्लाईड बनवण्यात येत असल्याचे

 वाडा: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील नेटाली भागात अरिहंत नामक कंपनीला आज दुपारी २.४५ सुमारास आग लागली आहे. कंपनीत वॉटर पार्कमध्ये लागणारी फायबर स्लाईड बनवण्यात येत असल्याचे सांगितले जाते. ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग विझण्यासाठी बोइसर,तारापूर, वसई या भागातून ५ अग्निशामक दलाच्या दाखल झाल्या आहेत.यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.अशी माहिती मनोर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.