पालघर नगर परिषद क्षेत्रात उद्यापासून ४ दिवस संपूर्ण लॉकडाऊन- बोईसर,सरावली आणि नवापूर गावातही बंदचे आवाहन

पालघर: पालघरमधल्या मिशन कम्पाउंड इथे राहणाऱ्या ५७ वर्षीय नर्सला काल कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पालघर शहरात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. मात्र तरी देखील विक्रेते आणि

 पालघर: पालघरमधल्या मिशन कम्पाउंड इथे राहणाऱ्या ५७ वर्षीय नर्सला काल कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पालघर शहरात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. मात्र तरी देखील विक्रेते आणि नागरिकांमध्ये अजूनपर्यंत लॉकडाऊनचे गांभीर्य दिसून आलेले नाही. त्यामुळे नगरपरिषद स्थायी समितीत सारासार विचार करून पालघर नगरपरिषद क्षेत्रात २९ एप्रिल ते २ मे पर्यंत असे ४ दिवस संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून ४ दिवस नगर परिषद क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन असणार असून या दरम्यान सकाळी ८ वाजल्यानंतर मेडिकल शिवाय काहीही सुरु राहणार नाही.याशिवाय नवापुर ग्रामपंचायतीकडून २८ एप्रिल तेे १ मे  या कालावधीत  तसेच बोईसर ग्रामपंचायत हद्दीत २७ एप्रिल ते १ मे आणि सरावली ग्रामपंचायत हद्दीत २८ ते १ मे पर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.