Palghar Lynching Case

ठाणे : गडचिंचले साधू हत्या प्रकरणात तब्बल २२८आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर  सोमवारी ठाणे जिल्हा विशेष मोब्लिचिंग कोर्टाने आणखीन ४७ आरोपीना जमीन मंजूर केला आहे. या पूर्वी याच कोर्टाने तब्बल ५८ जणांना जामिनावर मुक्तता केलेली आहे. त्यामुळे पालघर गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या १०५ वर पोहचलेली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये १२ आरोपी हे अल्पवयीन होते. तर कोर्टाने यापूर्वीच हत्येत प्रमुख भूमिका असल्याचा ठपका ठेवीत ३६ आरोपींचा जमीन अर्ज फेटाळला आहे.

ठाणे जिल्हा मोब्लिचिंग विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ४७ आरोपीना १५ हजाराच्या जातमुचलकाच्या जामिनावर सुटका केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. सोमवारी न्यायालयात आरोपींच्या वतीने वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले होते तेव्हा त्यांना जामिनावर सुटका करावी असा युक्तीवाद करण्यात आला.  या मोब्लिचिंग प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे १६ एप्रिल, २०२० रोजी दाखल केले.

या प्रकरणात दोन जुना आखाडा साधू चिकणे महाराज कल्पवृक्षागिरी (७०), सुशीलगिरी महाराज(३५) आणि त्यांच्या सोबत असलेला चालक निलेश तेलंगडे हे गडचिंचले  गावातून आपल्या गुरु असलेल्या महंत रामगिरी यांच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी सुरतकडे निघाले होते. त्यावेळी त्यांची गाडी वनविभागाच्या तपासणी नाक्यावर अडविण्यात आलेली होती. त्याचवेळी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. लोकांना लहान मुले पळविणारे असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला होता. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यातीळ आनंद राव काळे याना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्यासोबत अन्य दोन पोलीस कर्मचारीही निलंबित झाले होते. त्यातील एक सब इन्स्पेक्टर हा सेवानिवृत्त झाला.याच प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारी यांचे इन्क्रिमेंटही गोठलेले आहेत.

साधू हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात तब्बल ११ हजार पानाचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. सीआयडीच्या तपासात या हत्या प्रकरणात कुठलाही जातीय कारण नसून केवळ अफवा असल्याचे स्पष्ट मत तपास आवाहलात  मांडले. या प्रकरणात आतापर्यंत २२८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर पोलिसांनी जवळपास ८०८ जणांची संशयित म्हणून चौकशी केलेली आहे.