चोरांच्या अफवेमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी १०१ जण ताब्यात, अफवा न पसरविण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गडचिंचले येथे अफवेने चोर समजून मारण्यात आलेले तीन जणांच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना ताब्यात घेतल्याचे

 वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गडचिंचले येथे अफवेने चोर समजून मारण्यात आलेले तीन जणांच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी घटनास्थळी सकाळीच मोठा पोलीस फौजफाटा तेथे हजर झाला होता.गुरुवारी रात्री झालेल्या प्रकारात तीन प्रवाशांना चोर समजून पोलिसानं समोरच मारहाण करण्यात आली. यात  पोलीस जखमी झाले.गड चिंचले हे गाव दादरा नगर हवेली या सीमे जवळच आहे. या भागात चोर शिरल्याची अफवा गेले दोन तीन दिवसापासून चालू होती.यातच दरम्यानच्या काळात याच पोलिस स्टेशन अंतर्गत लॉकडाऊन परिस्थितीत गरीब आणि गरजू अन्न धान्याची पाकिटे  वाटणाऱ्यावर पोलिसांसमोर सारणी येथे हल्ला झाला होता. यातही पोलिसांच्या वाहनाचे दगड आणि इतर साहित्याने नुकसान होऊन पोलिसही जखमी झाले होते. या घटनेनंतर हा काही दिवसात हा प्रकार घडला.या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.

गावात चोर अथवा दरोडेखोर आले आहेत अशा अफवा पसरवू नये. अशा संशयित व्यक्तीबाबत नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून माहिती दयावी, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.  मारहाण केल्यास , मारहाणीत संशयित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपल्यावर खुनाचा गुन्हा दाखल होवू शकतो. अशा प्रकारचे कृत्य कोणी केल्यास अथवा त्यास प्रोत्साहन दिल्यास सदर व्यक्तीविरुध्द कायदेशीर  कार्यवाही करण्यात येईल .सोशल मिडीयावरील अफवा संदर्भात चुकीची माहिती प्रसारीत करु नये. अफवांना बळी पडू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले  आहे. सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून कायदा हातात घेवू नये.  सोशल मीडुयावरील मेसेज फॉरवर्ड करतांना सावधानता बाळगावी.  पोलीस तुमच्या मागावर आहेत हे विसरूनये गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवू देऊ नये . तसेच गावातील लोकांनी कायदा हातात न घेण्याबाबत जनजागृती करावी ,असेही आवाहन डॉ . कैलास शिंदे यांनी केले.