corona test

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या एच.आर.एच.यु अंतर्गत डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालय इथे कोव्हीड - १९ या आजाराची चाचणी आता सुरु करण्यात आली आहे. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात हे कोव्हीड१९ च्या चाचणीचे

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या एच.आर.एच.यु अंतर्गत डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालय इथे कोव्हीड – १९  या आजाराची चाचणी आता सुरु करण्यात आली आहे. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात हे कोव्हीड१९ च्या चाचणीचे पहिलं केंद्र सुरू करण्यात आलं आहे. ही चाचणी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कांचन वानेरे,पालघरचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र केळकर यांच्या सहकार्यामुळे हे कार्य यशस्वी झालेलं आहे.

तसेच डहाणू चे उपविभागीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार, डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग, आ.सी.एम.आर. संचालक डॉ.महाले, डॉ.कृष्णा विटा डहाणू उपजिल्हा रुग्णालय  इथले वैद्यकीय अधीक्षक डॉ.बालाजी हेंगणे , विलगीकरण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी, डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या परीश्रम आणि सहकार्यानं हे चाचणीचे केंद्र एम.आर.एच.यु अंतर्गत डहाणू उपजिल्हा रुग्णालय इथं सुरु करण्यास यश मिळालेलं आहे .