पालघर रेल्वे स्थानकावरून आज १३७५ लोकांना घेऊन उत्तर प्रदेशकडे एक ट्रेन रवाना – आकारण्यात आले ७०० रुपये प्रवास भाडे

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावरून आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यासाठी वसई मार्गे एक ट्रेन रवाना करण्यात आली आहे. यात पालघर आणि बोईसर मधले जवळपास

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावरून आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यासाठी वसई मार्गे एक ट्रेन रवाना करण्यात आली आहे. यात पालघर आणि बोईसर मधले जवळपास १३७५ लोकांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. या प्रवासासाठी जवळपास ७०० रुपये प्रत्येकी असे भाडे आकारण्यात आले आहे.

या सर्व प्रवाशांमध्ये पालघरचे जवळपास ३५० लोक आणि उर्वरित लोक हे बोईसरमधून आले होते. बोईसरमधल्या लोकांना बस आणि टेम्पोतुन पालघर रेल्वे स्थानकात आणण्यात आले.  पालघरमधून उत्तरप्रदेशसाठी ट्रेन सुटणार असल्याची माहिती मिळताच लोकांनी मोठ्या संख्येने पालघर रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली. ज्यात अर्ध्या लोकांना ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने त्यांना ते जिथून आले होते तिथे परतावे लागले. या सर्व प्रवाशांची पालघर रेल्वे स्थानकात थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.