जेष्ठ वकील पापा काझी यांचे कोरोनाने निधन

कल्याण : कल्याणातील ज्येष्ठ वकील अॅड.पापा काझी यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जुबेर नजमुद्दीन काझी असे त्यांचे पूर्ण नाव होते. काझी

 कल्याण : कल्याणातील ज्येष्ठ वकील अॅड.पापा काझी यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जुबेर नजमुद्दीन काझी असे त्यांचे पूर्ण  नाव होते. काझी यांच्या निधनाबद्दल समाजाच्या अनेक स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कायद्यातील निष्णात तसेच आपल्या करारी बाण्यासाठी पापा काझी प्रसिद्ध होते. हिंदू मुस्लीम धर्मियांमध्ये सलोखा राखण्यासाठी नेहमी ते अग्रेसर होते. मृत्यू समयी त्यांचे वय ६८ होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

पापा काझी यांच्या जाण्याने शिवसेनेचा कल्याणमधील हक्काचा जेष्ठ विधिज्ञ हरपला असल्याची भावना माजी माहापौर आणि जेष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनानंतर शिवसैनिक व नेते मंडळी यांच्यासाठी न्यायालयात धावत येऊन बाजू मांडण्याचे, जामीन मिळवण्याचे काम आजवर ते करत आले होते. काझी यांचे निधन ही कल्याणवासीयांना दुःखात टाकणारी घटना असल्याचे देवळेकर यांनी सांगितले.