kdmc parking issue

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) मनपा मुख्यालयापासून जवळच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महंमदआली चौक रस्त्यालगत दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने अस्तव्यस्त पार्क(parking) केली जात असल्याने त्यातच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ व बाजारपेठत येणाऱ्याची गर्दी, तसेच फुटपाथवरील फेरीवाल्याचे बस्तान यामुळे या रस्त्यावरून ये जा करण्याऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करीत ये जा करावी लागत आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) मनपा मुख्यालयापासून जवळच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महंमदआली चौक रस्त्यालगत दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने अस्तव्यस्त पार्क(parking) केली जात असल्याने त्यातच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ व बाजारपेठत येणाऱ्याची गर्दी, तसेच फुटपाथवरील फेरीवाल्याचे बस्तान यामुळे या रस्त्यावरून ये जा करण्याऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करीत ये जा करावी लागत आहे. यामुळे कल्याण वाहतूक शाखा, मनपा प्रशासन पार्किंगच्या विळख्यातून कशी सुटका करणार असा सवाल उभा राहिला आहे.

कल्याण डोंबिवली मनपाने मनपाक्षेत्रातील काही रस्त्यालगत पी१, पी२, नुसार सम विषम तारेखेनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्किंग करण्यासाठी सवलत दिली आहे. तर काही रस्त्यालगत नो पार्किंग झोन तयार केले असुन महासभेकडे धोरणात्मक निर्णय बाबत धोरण पाठवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पारनाका पर्यंत पर्यंत पी१, पी२ नुसार पार्किंगबाबत बोर्ड लावुन वाहतुक शाखा याबाबत अंमलबाजवणीकडे लक्ष देते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महंमद अल्ली चौक, ते दिपक हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशनसमोर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पार्किंग बाबत धोरण जाहीर नसल्याने संदर्भीत रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, तीनचाकी, चार चाकी वाहने बेशिस्तपणे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पंथस्थांना द्रविडी प्रणायम करीत वाटचाल करावी लागत आहे.

याबाबत कल्याण वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संदर्भीत रस्त्याच्या पार्किंग पॉलिसीबाबत धोरण मनपाने वाहतूक शाखेला कळवावे. त्यानुसार पार्किंग धोरणानुसार वाहनावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तर केडीएमसी शहर अभियंता सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता या वाहतूक समस्येबाबत रोडची पाहणी केली असुन संदर्भीत रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्याचे प्रस्तावित असुन कल्याण वाहतूक शाखेला बॅरीगेट, तसेच पार्किंग धोरणानुसार रस्त्यावर पार्किंग बोर्ड लावणे,तसेच वाहनांना लावण्याचे टोचण आदिबाबत प्रस्तावित असल्याचे सांगितले.