विरारमध्ये प्रवाशांचे उग्र रूप; वसई विरार परिवहन सेवा बंद

वसई-विरार: कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सेवा व बस सेवा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच रेल्वे व बस प्रशासनाच्या असभ्य वर्तणूक व अचानक रद्द करण्यात आलेल्या बस यामुळे विरार रेल्वे स्टेशन वर प्रवाशांचा प्रचंड उद्रेक झाला.

सामान्य नागरिकांचे जीवन कोरोना काळात असहय झाले असून कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त भाडे देऊन व हाल-अपेष्टा सहन करून नागरिक नोकरीवर जात आहेत. त्यातच रेल्वे कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सर्व ताण एसटी प्रशासनावर आहे.प्रशासनाच्या उद्धट वर्तनामुळे प्रवाशांच्या संकटात आणखीन भर पडत आहे.

गाडीत डिझेल नाही,गाड्या उपलब्ध नाहीत, ड्रायव्हर नाही ही किंवा गाड्या रद्द झाल्यात असे बेजबाबदार उत्तरे दिल्यामुळे विरार स्टेशन वर प्रवाशांचा संतापाला पारावार उरला नाही. म्हणून सर्व प्रवाशांनी एकत्र येऊन उग्र रूप धारण केले व त्यांचा रागाचा प्रचंड उद्रेक झाला.

विरार रेल्वे स्टेशन वर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव जमला व घोषणाबाजी झाली.एसटीने तात्काळ सेवा द्यावी किंवा रेल्वे सुरू करावी. अन्यथा असे आंदोलन रोजच होतील असे मत काही प्रवाशांनी मांडले. काही नियम व अटी घालून रेल्वे सेवा व बस सेवेन मध्ये वाढ करावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय कमी होईल व सामाजिक अशांतता थांबवता येईल.शासनाने ताबडतोब प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात अश्या मागण्या प्रवाशांनी केल्या आहेत.

महापालिकेने तोटा भरून काढण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या नाहीत. म्हणून ही परिवहन सेवा बंद करण्याचे ठरवले आहे. प्रतिमहा ४० ते ४५ लाख तोट्यात चालणारी वसई विरार महानगरपालिका परिवहन सेवा सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून तूट भरून काढण्यासाठी मनपाने ठोस उपाययोजना न केल्यामुळे वसई विरार परिवहन सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठ वर्षापासून वसई विरार परिवहन सेवा अविरतपणे सुरू आहे. यावेळी हा परिवहन ठेका घेतला गेला त्यावेळेस डिझेलचे दर व कर्मचाऱ्यांचा पगार कमी होता.परंतु आज सर्व वस्तूंचे दर दुपटीने वाढले असून दरमहा ४० ते ४५ लाखांचा तोटा परिवहन सेवेला सहन करावा लागत आहे. २०१५ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये ही परिवहन सेवेचे तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना सुचवल्या गेल्या आहेत.परंतु मनपाने त्या उपाय योजना अमलात आणल्या नाहीत त्यामुळे परिवहन सेवा पूर्णपणे आर्थिक संकटात सापडून कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर देऊ शकत नव्हती म्हणून कर्मचाऱ्यांनी जानेवारी २०२० मध्ये संप पुकारला व त्यानंतर विधानसभेमध्ये ही हा विषय मांडला गेला.पण मनपाने कसलेही आर्थिक पाठबळ न दिल्यामुळे आज परिवहन सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

कोरोना संकटकाळात परिवहन ठेकेदारांनी कर्जबाजारी होऊन कर्मचाऱ्यांचा पगार व अत्यावश्यक सेवा दिली. आज ५० टक्के प्रवासी घेऊन सेवा द्यावी असे महापालिका सांगत असून तेवढ्यात कर्मचाऱ्यांचा पगार व व डिझेलचा खर्चही निघणार नाही म्हणून परिवहन सेवा कशी चालवायची असा प्रश्न ठेकेदाराने समोर निर्माण झालेला आहे.

आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत शासनाने दिलेल्या दर द्यावा किंवा तूट भरून काढावी असे सांगितले. परंतु त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.तरीही आयुक्तांनी पाच तारखेपासून परिवहन सेवा सुरू करावी असे सांगितले. आर्थिक तोट्यामुळे परिवहन सेवा ठेकेदार देऊ शकत नाहीत म्हणून परिवहन सेवा बंद करीत आहे असे परिवहन ठेकेदार मनोहर सपकाळ यांनी सांगितले.