भिवंडीत उपचाराअभावी ह्रदयविकाराच्या रुग्णाचा मृत्यू

भिवंडी: शहरात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी तब्बल १०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील बाधीत रुग्णांचा एकूण आकडा ५७० च्या वर पोहचला आहे.

 भिवंडी: शहरात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी तब्बल १०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील बाधीत रुग्णांचा एकूण आकडा ५७० च्या वर पोहचला आहे. दरम्यान वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्ये बरोबरच शहरात इतर आजारांच्या रुग्णांची हेळसांड सुरु झाली आहे. इतर आजारपणातील रुग्णांवर उपचार करण्यास खासगी रुग्णालयातील डॉक्टर थेट नकार देत असल्याने रुग्णालयाचे उंबरठे झिजविण्यातच रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी ह्रदयविकाराचा झटका आलेल्या निलेश लदगे या तरूणास खाजगी व सरकारी रूग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. निलेश लादगे यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यास रिक्षातून शहरातील विविध हाँस्पिटलमध्ये फिरविले मात्र कोणीही या रूग्णास दाखल करून घेतले नाही. अखेर दवाखान्याचे उंबरठे झिजवण्यातच निलेशची प्राणज्योत मावळली अशी माहिती निलेशचे भाऊ अॅड अभय लदगे यांनी दिली आहे. या भयानक परिस्थितीत राज्य शासनाची व मनपाची आरोग्यव्यवस्था जिवंत आहे की मृत झाली असा प्रश्न देखील अॅड अभय लदगे यांनी उपस्थित केला आहे.