पालघरमधील कासा रुग्णालयातून २२ कोरोना संशयित रुग्णांचे पलायन, शोध अद्याप सुरू

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणूतील कासा उपजिल्हा रुग्णायातील २२ कोरोना संशयित रुग्णांनी पळ काढला असल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.कासा रुग्णालयातील कंत्राटी सेवेतील वैदयकीय कर्मचारी व

 वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणूतील कासा उपजिल्हा रुग्णायातील २२  कोरोना संशयित रुग्णांनी पळ काढला असल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.कासा रुग्णालयातील कंत्राटी सेवेतील वैदयकीय कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक असे २२ जणांनी पळ काढला असल्याचे सांगितले जाते. या बाबत जवळील कासा पोलीस ठाण्यात याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली असून या संशयित रुग्णाचा अद्याप शोध चालू  आहे.या घटनेने या परिसरात खळबळ माजली आहे. डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात आंतरवासिता म्हणून काम करणारे दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांच्या संपर्कातील १५० जणांचे  अहवाल प्राप्त झाले असून त्यातील १४९ सहवासी तांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, कासा उपजिल्हा रुग्णालयात  उपचार घेत असलेल्या 26 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर ३७ सहवासीतांचे अहवाल अप्राप्त आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली जाते.