राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांना मिळणार वेतन – महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीच्या मागणीला यश

कल्याण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीच्या मागणीला यश आले असून राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी

 कल्याण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीच्या मागणीला यश आले असून राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांना नियमित वेतन देण्याचे पत्रक काढले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा बंद असल्यामुळे शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांना व कर्मचारी पगार सुरू असताना विनाअनुदानित राज्यातील इंग्रजी शाळा च्या शिक्षक व कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी,  आयसीएसई,  आयबी  आणि स्टेट बोर्ड  या शाळांमधील  बऱ्याच शाळांनी आपली मनमानी सुरू केली होती. राज्यातील बहुतांश शाळांनी मार्च, एप्रिल पासून शिक्षकांना पगार देणे बंद केलेले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद पवार व त्यांच्या सोबत समितीचे पदाधिकारी अनिल बोरनारे, गुलाबराव पाटील, अविनाश ओंबासे, उदय नाईक यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन देऊन शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विनंती होती. तसेच लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती आणि मागणी मान्य न झाल्यास उपोषणला बसण्याचा इशारादेखील दिला होता.
 
या निवेदनाची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेत शासनाने राज्यातील विनाअनुदानित शाळांना मधील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांना नियमित वेतन देण्यात यावे असे पत्रक बुधवारी काढले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी राज्यातील लाखो शिक्षकांना शासनाने न्याय दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.