bibtya in thane

राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या येऊर जंगलातून(yeur forest) भटकत आलेल्या बिबट्याने(leopards) मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास येऊर परिसरात बेधडक फेरफटका मारला. बिबट्याच्या येऊरमधील वावराने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

ठाणे : राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या येऊर जंगलातून(yeur forest) भटकत आलेल्या बिबट्याने(leopards) मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास येऊर परिसरात बेधडक फेरफटका मारला. बिबट्याच्या येऊरमधील वावराने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच वनविभाग सतर्क झाले असून बिबट्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वनाधिकारी डॉ. विजय बारध्ये यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या येऊरच्या काही हभागात मानवी वस्ती वाढत गेल्याने वन्यप्राणी हे नागरी वस्तीत शिरकाव करीत असल्याच्या यापूर्वीच अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी बिबट्याने मानवी वस्तीत घुसखोरी करून चक्क वनविभागाला सळो की पळो  करून सोडले होते. त्यानंतर अनेकदा बिबट्याने ठाणेकरांना दर्शन दिले आहे. मात्र मंगळवारी येऊरच्या मानवीवस्तीच्या शेजारी जंगलात प्रत्यक्षदर्शी जयेश जाधव या तरुणाला बिबट्या दिसला. तो एका झोपडीच्या बाजूला बसला होता. बघ्यांची गर्दी वाढल्याने बिबट्याने डरकाळी फोडतात नागरिकांची घाबरगुंडी उडाली. अन बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच बिबटयाचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊर येथे दाखल झाले मात्र अनेक तास शोधल्यास बिबट्या सापडला नाही. दरम्यान वनविभाग मात्र बिबट्याचा शोध बुधवारीही घेणार आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते बिबट्या हा जखमी असावा असा संशय व्यक्त केला. बिबट्या चालताना लंगडत असल्याचेही नागरिकांनी पाहिलेल आहे. साधारणतः बिबट्या २ ते ३ वर्षाचा असावा,असा अंदाज वनविभागाचे अधिकारी बारध्ये यांनी सांगितले. दरम्यान अचानक येऊरच्या परिसरात मानवी वस्तीत बिबट्या आढळल्याने मात्र नागरिकांची रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.