रिक्षा प्रवासी वाहतुकीस परवानगी द्या – कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : रेल्वे, परिवहन बस प्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्याकरीता शासनाने

 कल्याण : रेल्वे, परिवहन बस प्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्याकरीता शासनाने लॉकडाऊन, संचारबंदी कालावधीत रेल्वे, बसेस याप्रमाणे रिक्षा टॅक्सी वाहतुकीला बंदी घातली. यामुळे गेले दोन महिने रिक्षा टॅक्सी वाहतूक संपूर्णपणे ठप्प आहे. यामुळे रोजगार बंद झाल्यामुळे हातावरच पोट असलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांचा आणि त्यांच्या  कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांवर अक्षरक्षः उपासमारीची वेळ आलेली आहे. रिक्षाचालक आपले व कुटुंबियांचे लॉकडाऊनच्या कालावधीत पालनपोषण कसे करावे, या चिंतेत आहे.

माथाडी कामगार, नाका कामगारांप्रमाणे रिक्षा टॅक्सी चालकांना या अडचणीच्या काळात आर्थिक मदत, सोयी, सवलती देणे अत्यावश्यक आहे. मात्र आजतागायत रिक्षा टॅक्सी चालकांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांची दखल घेवून रेल्वे व सार्वजनिक उपक्रम बसेस वाहतुकीप्रमाणे अडचणीत असलेल्या रिक्षा चालकांना ठराविक वेळेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्हा तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्र आणि महाराष्ट्र राज्य शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.