सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या – नाभिक समाजाची मागणी

भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शासनाच्या आदेशाने २३ मार्चपासून सलून व्यवसाय बंद सल्याने आता नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून व्यवसायिकांना तातडीने पन्नास

 भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शासनाच्या आदेशाने २३ मार्चपासून सलून व्यवसाय बंद सल्याने  आता नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून व्यवसायिकांना तातडीने पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देऊन आता सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाज वेल्फेअर असोसिएशन भिवंडी याच्या वतीने एका निवेदनाद्वारे भिवंडी उपविभागीय (प्रांत) अधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २३ मार्चपासून जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे व जास्तीत जास्त जनसंसर्ग होण्याचा धोका ओळखून  नाभिक महामंडळाने  सलून व्यवसायिकांना केलेल्या आवाहनानुसार  २३ मार्च पासून सलून व्यवसाय बंद आहे.. अर्थिक दूर्बंल घट्कातील व  हातावर पोट असलेला   नाभिक व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत येऊन त्याच्या वर उपासमारीची वेळ आली आहे याविषयी वेळोवेळी निवेदनाद्वारे ही परिस्थिती नाभिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या निर्देशनास आणली होती.  शासनाकडे अर्थिक मदतीची मागणीदेखील केली होती. मात्र शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने सलून व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.  उपाशी मरण्यापेक्षा आंदोलन करून मरू असा इशारा या व्यावसायिकांनी दिला आहे.

याविषयी  नाभिक समाज वेल्फेअर असोसिएशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल खंडागळे, बाराबलूतेदार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नागेश जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत. तहसिलदार आदींना निवेदन सादर करून सलून व्यवसायिकांना तातडीने पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जावी. तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांना  उद्योग सुरू करण्यासाठी  जशी टप्याटप्याने सुट दिली त्याप्रमाणे सलून व्यवसाय देखील सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाज वेल्फेअर असोसिएशन शासनाकडे केली आहे.