ph d holder prem jadhav

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील पिंपळास खेडेगावातील प्रेम  जाधव(prem jadhav) यांना ग्लोबल पीस  युनिव्हर्सिटीकडून शिक्षणशास्त्र या विषयात मानद पीएच. डी.(ph.d) मिळाली आहे.  भारती विद्यापीठ बेलापूर येथे त्यांना पीच.डी. पदवीने  सन्मानित करण्यात आले.

प्रेम जाधव यांना लहानपणापासून शिकण्याची आवड आहे. ते आंबेडकरी विचारांवर प्रभावित आहेत. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याने सदैव नवीन नवीन शिकले पाहिजे.हे प्रेम जाधवांचे विचार आहेत.  यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, नगर येथे वर्ल्ड पार्लमेन्टचा इंटरनॅशनल अवॉर्ड, व नागपूर येथे राष्ट्रीय रत्न अवॉर्ड मिळाले आहे. आजच्या कार्यक्रम प्रसंगी डॉ. दत्ता शिंदे, डॉ. संदीप सिंग, डॉ. दिनेश गुप्ता, मिस इंडिया व  कलाकार सिमरन अहुजा हे उपस्थित होते.

जाधव यांचे अध्यापन उत्तम असून शंभरपेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी आजपर्यंत दिली आहेत. त्यांचा अंगठी हा कथासंग्रह ही प्रकाशित झाला आहे. प्रतिलिपीवर त्यांच्या अनेक कथा, काव्य त्यांचे  प्रकाशित आहेत.  ते केवळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत नसून नाट्यक्षेत्रातही काम करत आहेत.  सावित्री,  नेवाळी २२ जून व नाळ या वास्तववादी नाटकाची त्यांनी निर्मिती केली आहे. अनेक ग्रामीण कलाकारांना रंगभूमीवर संधी दिली आहे. त्यांचा एकूण प्रवास कुणीही आदर्श घ्यावा असा आहे.