नरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते, पंतप्रधानांच्या सख्ख्या भावाचा गौप्यस्फोट

प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचा उल्लेख करतात. पण मोदींचे सख्खे भाऊ प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी मात्र नरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते, तुम्ही म्हणायचं असेल तर त्यांना चहावाला म्हणा आणि आम्हाला चहावाल्याचे बेटे म्हणा, असं म्हटलं.

    प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मागील दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलंय. अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्यानं आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं.

    मागण्या पुर्ण होइपर्यंत GST भरु नका

    रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचं लक्ष वेधायचं असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पहा, उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील. असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं.