महाराष्ट्र भूषण कवी मधुकर जोशी यांचे दुःखद निधन

डोंबिवली : ‘अशीच आमुची आई असती’ हे अजरामर गीत लिहिणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त कवी मधुकर जोशी यांचे आज सकाळी ८.४० च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात किडनीच्या विकाराने

 डोंबिवली : ‘अशीच आमुची आई असती’ हे अजरामर गीत लिहिणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त कवी मधुकर जोशी यांचे आज सकाळी ८.४०  च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात किडनीच्या विकाराने निधन झाले ते ९० वर्षाचे होते. कवी मधुकर जोशी डोंबिवलीत पूर्वेकडील ‘हेरंब’ इमारतीत गेली ४०-४५ वर्षे रहात होते. काही वर्षांपूर्वी इमारत मालकाने इमारत धोकादायक म्हणून रिकामी करण्याची नोटीस दिली होती पण बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना दुसरी जागा घेणे परवडणारे नव्हते. मी जागेसाठी सरकारकडे भीक मागणार नाही अशी त्यांची परखड भूमिका होती.

डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन संपन्न झाले त्यापूर्वी संमेलन आयोजकांनी घरी जाऊन त्याचा सन्मान केला होता व नवीन जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पण दिले होते पण संमेलन संपले आणि आयोजकांना विसर पडला पण या बद्दल त्यांनी कधीही खंत बाळगली नाही. साहित्य क्षेत्रात कवींना अजिबात किंमत नाही, मात्र लेखकाना खूप मान सन्मान आहे पण माझी काही तक्रार नाही, मी कुणाकडे हात पसरला नाही व पसरणार नाही अशी त्याची भूमिका होती व शेवट पर्यंत ती कायम राहिली
अशीच आमुची आई असती, रिम झिम झरती श्रावनधारा, एका तळ्यात होती अशी किती तरी सरस गीते त्यांनी लिहिली. साहित्यावर नितांत प्रेम असणाऱ्या ज्येष्ठ कवीला उपेक्षित जीवन जगावे लागले पण तरीही त्यांनी स्वाभिमान सोडला नाही आणि आज त्याचे किडनी विकाराने निधन झाले त्याच्या पश्चात ३ मुले व २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे दुपारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिव मंदिर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.