navnath rankhambe diamond record

कल्याण : अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कवी संमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कुल येथे आयोजित केले गेले होते. साहित्य क्षेत्रात ठसा उमटवून कल्याणच्या नावलौकिकात भर घालणारे हरहुन्नरी कवी(poet) नवनाथ रणखांबे(navnath rankhambe) यांनी या विक्रमी(record) कवी संमेलनात सहभाग घेतला होता. या संमेलनाच्या विक्रमाची ऐतिहासिक डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे कवी नवनाथ रणखांबे यांची डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहभागाची नोंद झाली असून त्यांना उपक्रम प्रमुख डॉ. योगेश जोशी यांच्याहस्ते सन्मानपत्र आणि मेडल देऊन कल्याणमध्ये सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने सन्मानित असलेले कवी नवनाथ रणखांबे हे इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित आहेत.