धक्कादायक – चक्क ६ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करुन विकण्याचा रचला डाव, पोलिसांनी २ महिलांसह ५ जणांना ठोकल्या बेड्या

कल्याणमधील मोहम्मद अली चौकातील शिवमंदिरा जवळ एक महिला आपल्या सहा महिन्याच्या मुलांसमवेत ५ जून रोजी झोपली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून ६ महिन्यांच्या मुलाचे अपहरण(Kidnapping) करण्यात आले होते .

    कल्याण : सहा महिन्यांच्या(6 Months baby Kidnapping) मुलाचे अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलिसांनी २ महिलांसह ५ जणांना अटक(5 Kidnappers Arrested in Kalyan) केली आहे.

    कल्याणमधील मोहम्मद अली चौकातील शिवमंदिरा जवळ एक महिला आपल्या सहा महिन्याच्या मुलांसमवेत ५ जून रोजी झोपली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून ६ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते . याबाबत महिलेने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून गुन्हे प्रकटीकरण विभाग या बाबत तपास करीत होते.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे तसेच प्रकाश पाटील यांच्या शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज वरून माहिती घेत कल्याणातील पत्री पूल आणि दिवा येथून पाच अपहरणकर्त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. विशाल त्र्यंबके ,कुणाल कोट, फरहान अब्दुल माजिद आणि आरती कोट, हिना फरहान माजिद या ५ जणांचा समावेश आढळून आला.

    या ६ महिन्यांच्या मुलाची विक्री एक लाख रुपयाला करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे. मुलाच्या विक्रीतून ४० हजार रुपयांची रक्कम अगोदरच अपहरणकर्त्यांनी घेतली होती. पाचही जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली.