thieve arrest

चालत्या एक्सप्रेसमधून महिलेची पर्स(Purse Theft In Express) चोरून पळणाऱ्या चोरास कल्याण(Kalyan) रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पकडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे.

    कल्याण : चालत्या एक्सप्रेसमधून महिलेची पर्स(Purse Theft In Express) चोरून पळणाऱ्या चोरास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पकडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. चोरट्याचे नाव इमरान अली सिद्दीकी असे असून तो टिटवाळा येथे राहणारा आहे. काही दिवसांपासून रेल्वेत चोरी आणि लुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही एक चिंतेची बाब आहे.

    बुधवारी जोधपूर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात थांबली. जालाराम पटेल आणि त्यांचे कुटुंबीय या एक्सप्रेसमधून जोधपूरहुन कर्नाटकला जात होते. थोड्याच वेळात ट्रेन सुरु झाली. ही संधी साधत चोरटा ट्रेनमध्ये घुसला. त्याने पटेल यांच्या वहिनीची पर्स हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने काही पोलीस कर्मचारी त्याठिकाणी गस्त घालत होते. त्यांची नजर या चोरट्यावर गेली. त्यांनी त्वरीत त्याचा पाठलाग केला. ट्रॅकवरुन या चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    इमरान या चोराने चोरलेली पर्स हस्तगत करण्यात आली आहे. त्यात पाच मोबाईल आणि दागिने हा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सध्या हा चोरटा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून पुढील करावाई सुरु असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी दिली.