पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणानंतर पोलिसांनी हाती घेतला अफवांबद्दलच्या जनजागृतीचा उपक्रम

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले भागात चोर असल्याच्या अफवेने तीन जणांना अमानुष मारहाण करण्यात आली. यात ते ठार झाले. या घटनेवर देशभरातून टीका करण्यात आली. या प्रकरणात१०१

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले भागात चोर असल्याच्या अफवेने तीन जणांना अमानुष मारहाण करण्यात आली. यात ते ठार झाले. या घटनेवर  देशभरातून टीका करण्यात आली. या प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या वतीने अफवांविषयी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस गावोगावी जाऊन अफवेविषयी जनजागृती करत आहेत. कुणीही अफवा पसरवू नये.कोणत्याही अनोळखी इसमास चोर किंवा दरोडेखोर समजून मारहाण न करण्याबाबत सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात येत आहेत.

वाडा पोलीस ठाणे हद्दीत गडचिंचले येथील प्रकरणाच्या अनुषंगाने कळमखांड, कंचाड, आंबिवली, सावरोली, म्हसरोली, कुमदल, आमगाव,पांढरेपाडा,शेल्टे,गाेहा,वावेघर,पाली,पोशेरी,फणसपाडा,वंगणपाडा,मांगरूळ,वरसाळे,कुडुस,चिंचघर,सापरोंडे,दिनकरपाडा,कोंढले,मागाठणे,वडवली,नारे,मुसारणे या भागात जनजागृती केली जात  आहे.