कोरोनावर मात करून कर्तव्यावर हजर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अभूतपूर्व स्वागत

भिवंडी : जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना विरोधात रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या पोलीस दलातील असंख्य पोलीस जवान, अधिकारी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे येथे

 भिवंडी : जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना विरोधात रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या पोलीस दलातील असंख्य पोलीस जवान, अधिकारी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे येथे नेमणुकीवर असलेले पोलीस नाईक यांना १ जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट वरून स्पष्ट झाले . त्यांना सफायर हॉस्पिटल, खारेगाव, ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची शेवटची तपासणी निगेटिव्ह आल्याने त्यांना दि.१२ जून रोजी घरी सोडण्यात आले व ७ दिवस घरात होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला होता.त्यानंतर नुकतेच हे पोलीस नाईक  कोरोनावर मात करून आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी आले असता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांसह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे पोलीस ठाण्यात रुजू होत असताना पुष्पवर्षाव करून तसेच शाल व श्रीफळ देऊन स्वागत करीत त्यांच्या निरोगी आरोग्य लाभावे याकरिता शुभेच्छा दिल्या. या अभूतपूर्व स्वागताने ते पोलीस नाईक भारावून गेल्याने त्यांच्या डोळ्यातसुध्दा आनंदाश्रू तरळले होते .