Police combing operation on Kalyan Skywalk Police in riot gear stormed a rally on Friday removing hundreds of protesters by truck
कल्याण स्कायवॉकवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; ८० पोलिसांनी परिसर पिंजून दहा जणांना घेतले ताब्यात

आरोपीच्या शोधात पोलिस पथक तयार करण्यात आले असून त्याचा शोध घेतला जात आहे. महापालिकेसही सुरक्षितता पुरविण्याकरीता आयुक्तांना विनंती पत्र दिले असल्याचे सांगितले.

कल्याण : कल्याण पूर्व आणि पश्चिम रेल्वे वरील स्कायवॉकवर मंगळवारी पहाटे एका तरुणीची एका तरुणाने छेड काढल्याची घटना व रात्री एका तरूणांचा मोबाईल हिसकावत मानेवर धारदार वस्तूने घाव करीत चोरट्याने पोबारा केला. या एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने बुधवारी पोलिसांनी स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन करत दहा जणांना ताब्यात घेतले.

मंगळवारी घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनेतील आरोपीच्या शोधात कल्याण स्कायवॉकवर कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखली ८० पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. संपूर्ण स्कायवॉक, रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्डवर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या दरम्यान आरोपीचा शोध घेण्यात आला.

या कारवाई दरम्यान स्कायवॉकवर फिरणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. आरोपीच्या शोधात पोलिस पथक तयार करण्यात आले असून त्याचा शोध घेतला जात आहे. महापालिकेसही सुरक्षितता पुरविण्याकरीता आयुक्तांना विनंती पत्र दिले असल्याचे सांगितले.