पोलिसांनी लोकसहभागातून गोळा केले धान्य, ३०० मजुरांंना दिला मदतीचा हात

भिवंडी: खाकी वर्दीतल्या पोलिसांनी स्वतःची पदरमोड करून ३०० मजुरांची भूक भागवली आहे. त्यामुळे खाकी वर्दीवाल्यांची माणूसकी पाहून त्या तीनशे मजुरांनी पोलिसांचे आभार

भिवंडी: खाकी वर्दीतल्या पोलिसांनी स्वतःची पदरमोड करून  ३००  मजुरांची भूक  भागवली आहे. त्यामुळे खाकी वर्दीवाल्यांची माणूसकी पाहून त्या तीनशे  मजुरांनी  पोलिसांचे आभार  मानले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकराने लॉकडाऊन घोषित करून आज ३७ दिवस झाले. या दिवसात हातावर पोट असणाऱ्या हजारो कुटुंबांना विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने अन्नधान्य वाटप करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न करीत गरिबांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी कोनगाव  पोलिसांचा म्हणजेच खाकी वर्दीवाल्यांचाही सहभाग समोर आला आहे.तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा केली .त्यांनतर जमा झालेल्या वर्गणीच्या रकमेतून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मा निवास चाळ येथील हातावर पोट असणाऱ्या ३०० गरीब कुटुंबाना धान्य वाटप  केले.