hooka parlor raid

भिवंडी शहरातील शांतिनगर पोलिस स्टेशन अंर्तगत अवचित पाडा, तबेल्याच्या समोर  कासीब चाय टी सेंटर मध्ये अवैध  हुक्का पार्लर चालवत असल्याची खबर  शांतिनगर पोलिसाना मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून  पोलिस शिपाई गणेश अनंता हरणे यांनी कासीब टी सेंटरच्या आतमध्ये  हिमाशु मुलचंद्र जैस्वार (२२) हा जोत्सनानगर नागांव मध्ये हुक्का पार्लर चलवत असताना रंगेहाथ अटक केली आहे

भिवंडी : भिवंडी शहरातील हुक्का पार्लर (hookah parlor) मध्ये युवकांना  नशेची सवय लावून त्यांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या अवैध(illegal ) रित्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा (Police raid) टाकून पाच जणांच्या टोळीला अटक (arrest) केली आहे

भिवंडी शहरातील शांतिनगर पोलिस स्टेशन अंर्तगत अवचित पाडा, तबेल्याच्या समोर  कासीब चाय टी सेंटर मध्ये अवैध  हुक्का पार्लर चालवत असल्याची खबर  शांतिनगर पोलिसाना मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून  पोलिस शिपाई गणेश अनंता हरणे यांनी कासीब टी सेंटरच्या आतमध्ये  हिमाशु मुलचंद्र जैस्वार (२२) हा जोत्सनानगर नागांव मध्ये हुक्का पार्लर चलवत असताना रंगेहाथ अटक केली आहे. तो अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवत होता.

हुक्का पीताना  शाहबाज फहीम शेख (२१) रा, खाड़ीपार,फहीम हारुन अंसारी (२०) रा, संगम पाडा,नफीस लकाहू कुरेशी (१९) रा, अवचित पाडा आणि अनिस ननकू कुरेशी (२१) रा, अवचित पाडा आशा पाच जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून पोलिस शिपाई गणेश अनंता हरणे यांनी शांतिनगर पोलिस स्टेशन मध्ये कासीब टी सेंटरचे मालक यांच्या सह हुक्का पीनारे ४ युवकांसह एकूण ५ जनाविरोधात भादंवि  कलम १८८,२६९, सह राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब),सह सिगरेट व तंबाकू जन्य पदार्थ अधिनियम २०१८ कलम ४,२१(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबरोबर   ४ हजार रुपये कीमतीचे ४ हुक्का मशीन,१ हजार रुपये कीमतीचे विविध मिश्रित तंबाकू व ३५० रुपये कीमतीचे  फाईल पेपर बॉक्स असे मिळून एकूण ५३५० रुपये के मुद्देमाल  जब्त करून पाच ही आरोपी विरोधात CRPC कलम ४१(१) प्रमाणे नोटिस देऊन सोडण्यात आले या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्रीराज माली अधिक तपास करित आहेत