procession of a criminal

आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता(Procession After Getting Bail) केली असतानाच टिटवाळा पोलीस स्टेशनच्या(Titwala Police Station) हद्दीतील वरप गावातील राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या रस्त्यांवर आरोपींची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

    कल्याण : मोक्का(MOCCA) अंतर्गत कल्याण मध्यवर्ती कारागृहात(Central Jail) शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता(Procession After Getting Bail) केली असतानाच टिटवाळा पोलीस स्टेशनच्या(Titwala Police Station) हद्दीतील वरप गावातील राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या रस्त्यांवर आरोपींची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक प्रकरणी तसेच फटाके व घोषणाबाजी करून दहशत पसरविल्या प्रकरणी नियमभंग केल्याने पोलिसांनी सुटून आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

    पाच वर्षापूर्वी वरप येथे राहत असणाऱ्या कुख्यात गुंड गणेश श्रीपत मस्कर व त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. एका बांधकाम व्यावसायिकांवर गणेश याने फायरिंग केले होते. हा व्यवसायिक थोडक्यात बचावला होता. टिटवाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सीनियर इन्स्पेक्टर व्यंकट आंधळे यांनी गंभीर गुन्ह्यांची एकत्रित माहिती घेत गणेश मस्कर या गुंडावर मोक्का लावून कारवाई केल्याने गेल्या पाच वर्षापासून तो कल्याण मध्यवर्ती कारागृहात सजा भोगत होता.

    बुधवारी कुख्यात गुंड गणेश व त्याच्या साथीदारांची कारागृहातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने भर रस्त्यात त्यांची मिरवणूक काढून फटाके व नारेबाजी करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टिटवाळा पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने गुंड गणेश मस्कर, महेश पाल, फुलचंद जहा बिहारी, मनीष मस्कर, भावेश देसले, साहिल देसले व इतर पस्तीस ते चाळीस जणांविरोधात पोलीस हवालदार नाईक यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. जामिनावर सुटलेल्या गुंडाला पुन्हा पोलिसांनी अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचे टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.