कल्याणामध्ये पोलिसांचा रूटमार्च

कल्याण : गणेशोत्सव आणि मोहरम या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी रूटमार्च काढला. यामध्ये एस.आर.पी.एफ.चे २०० जवान, पोलीस स्टेशनचे १०० जवान, ५० अधिकारी यांचा समावेश होता. येणारे सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावे हे जनतेला आश्वस्त करण्यासाठी या रूटमार्चचे आयोजन केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या रूटमार्च दरम्यान पोलिसांनी सामाजिक अंतर पाळत नागरिकांनी देखील सण उत्सव साजरे करतांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले.