pankaj ashiya

भिवंडी: जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सर्वत्र सुरु असलेली पल्स पोलिओ(polio) लसीकरण मोहीम बालकांसाठी अतिशय आवश्यक आहे. कोरोनाच्या(corona) काळामध्ये त्याची अधिक आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लसीकरण टाळू नका.प्रत्येक ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात यावेत, असे आवाहन भिवंडी पालिका आयुक्त(bhivandi corporation commissioner) डॉ.पंकज आशिया(doctor pankaj ashiya) यांनी नागरिकांना केले आहे.सन २०२० या वर्षातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात आयुक्त पंकज आशिया यांच्या हस्ते स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यावेळी आयुक्त पंकज आशिया बोलत होते.

यावेळी पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोकाशी,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.बुशरा सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत धुळे,जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडी समन्वयक डॉ.किशोर चव्हाण,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया पुढे म्हणाले की,कोणत्याही परिस्थितीत ०  ते ५ वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.गेल्या अनेक वर्षापासून पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रकारे भिवंडी पालिका क्षेत्रात राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करावयाची आहे. रविवारपासून या पुढील पाच दिवस २१ ते २५ तारखेपर्यंत वैद्यकीय विभागाकडील पथक कर्मचारी आपल्या घराघरात पोलिओ लसीकरण करता येणार आहेत. त्यावेळी या वैद्यकीय विभागातील पथकाला सहकार्य करावे व आपल्या घरातील सर्व पाच वर्षपर्यंतच्या  मुलांना पल्स पोलिओ लस देण्यात यावी.

पल्स पोलिओ उपक्रमाबरोबरच ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या योजनेची देखील माहिती देण्यात आली.याबाबत आयुक्तांनी सर्व उपस्थितांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ याबाबत प्रतिज्ञा देखील दिली. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहनदेखील पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी याप्रसंगी केले.पालिका आयुक्तांच्या हस्ते पाच लहान मुलांना पोलिओ लस देण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त डॉ. आशिया यांनी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली.