पालघर मॉब लिंचिंग प्रकरणानंतर आता आणखी ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, ३५ जणांच्या बदल्या

वाडा: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात अंतर्गत गडचिंचले भागात जमावाकडून तीन प्रवाशांना मारण्यात आले. या प्रकरणी आणखी ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस जिल्हा

वाडा: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात अंतर्गत गडचिंचले भागात जमावाकडून तीन प्रवाशांना मारण्यात आले. या प्रकरणी आणखी ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.निलंबन कारवाई चौकशीतून पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी केली आल्याचं सांगण्यात येते.यात निलंबन करण्यात आल्याची संख्या ५ झाली आहे तर ३५ जणांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ए.एस. आय साळुंखे,अन्य दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.या अगोदर या पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे,पोलीस उपनिरीक्षक  यांच्यावर ठपका ठेवून निलंबन करण्यात आले होते. तर पोलीस ठाण्यातील ३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून दूरध्वनी द्वारे देण्यात आली आहे.  या बदल्या जिल्हांतर्गत झाल्या असल्याची माहिती सांगण्यात येते.