राजकीय पक्षाच्या माथाडी संघटनांकडून वागळे इस्टेटमधील उद्योजकांकडे खंडणीची मागणी, तिघांना अटक

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट (wagle estate)येथील उद्योजकांकडून कथित माथाडी कामगार आणि राजकीय पक्षांच्या कामगार संघटनाच्या नावाखाली खंडणी(extortion issue in thane) वसूली आणि धमक्यासत्र सुरू झालेले आहे.

ठाणे :  कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट (wagle estate)येथील उद्योजकांकडून कथित माथाडी कामगार आणि राजकीय पक्षांच्या कामगार संघटनाच्या नावाखाली खंडणी(extortion issue in thane) वसूली आणि धमक्यासत्र सुरू झालेले आहे. गेल्या तीन महिन्यात वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील १० उद्योजकांनी त्यांच्या तक्रारी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनकडे (टिसा) दिल्या आहे. यासंदर्भात टिसा संघटनेने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे. यानंतर आता वागळे पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्येही सुमारे एक हजार विविध छोटे-मोठे उद्योग आहेत. टाळेबंदीला टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू वागळे इस्टेट येथील उद्योग सुरू होत आहेत. मात्र, या उद्योजकांना आर्थिक संकटानंतर खंडणीखोरीच्या किडीला सामोरे जावे लागत आहे. या औद्योगिक परिसरात खंडणीखोरांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. औद्योगिक क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून कथित माथाडी कामगार राजकीय पक्षांच्या नावाखाली उद्योजकांना धमकावत तसेच त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्ना करू लागले आहेत. या कथित माथाडी कामगारांकडे राज्य शासनाकडून दिला जाणारा अधिकृत नोंदणी क्रमांकही नसतो. अशाप्रकारच्या १० तक्रारी गेल्या तीन महिन्यात ‘टिसा’कडे आलेल्या आहेत. त्यानुसार माथाडी कामगार नेत्यांशी आणि ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.

उद्योजकांना माथाडी कामगार संघटना सतावत आहेत. त्यांच्याकडे कामाऐवजी खंडणी १० ते १२ हजार रुपयांची मागितल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याप्रकरणी तिघांना अटक केलेली आहे. अधिक तपास सुरु आहे.

- दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलीस ठाणे

अशाप्रकारच्या १० तक्रारी गेल्या तीन महिन्यांत 'टिसा'कडे आलेल्या आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच टिसा संघटनेने या संदर्भात माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबतही झूम मिटींगद्वारे संवाद साधला. त्यांनीही खंडणीचे प्रकार करणारे हे माथाडी कामगार नसल्याचे सांगितले. तर दोनच दिवसांपूर्वी टिसाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातलेला आहे.

- निखिल सुळे , टिसा मेंबर्स व फिर्यादी