भिवंडी शहरातील हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था ;  शिवसेनेचा आरोप

भिवंडी : भिवंडी पालिकेच्या पाच प्रभागात मुलभूत सुविधांचा अभाव , उघडी तुंबलेली गटारे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने एक बकाल शहर म्हणून शहराची ओळख असतानाच गेल्या काही दिवसांपासून पालिका क्षेत्रातील

भिवंडी : भिवंडी पालिकेच्या पाच प्रभागात मुलभूत सुविधांचा अभाव , उघडी तुंबलेली गटारे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने एक बकाल शहर म्हणून शहराची ओळख असतानाच गेल्या काही दिवसांपासून पालिका क्षेत्रातील स्मशानभूमीचा  गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. भिवंडी शहरात असलेल्या सर्व  स्मशानभूमीची अवस्था बिकट झाली आहे .त्या ठिकाणी लाईट,पाणी,लाकडं,स्वच्छता, मृत्यू नोंदणी रजिस्टर, वॉचमन, सुरक्षा रक्षक अशा  कोणत्याही मुलभूत सुविधा नाहीत.स्मशानभूमीसाठी  कर्मचारी नियुक्त केलेले असूनही त्याठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित न राहता खोट्या सह्या करून पगार लाटत आहेत . स्मशानभूमीचे दुरुस्तीसाठी टेंडर निघून सुध्दा स्मशानभूमीची अवस्था  अधिक बिकट झालेली दिसते आहे.यासर्व बाबीचे निवेदन कामतघर प्रभाग क्र २१ चे शिवसेना माजी सभापती व नगरसेवक अशोक भोसले यांनी शिवसेना गटनेते  संजय म्हात्रे यांनी आयुक्त डॉ पंकज अशिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व भिवंडी शहरातील स्मशानभूमीच्या  दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन करावे अशी विनंती केली आहे. पालिका आयुक्तांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.