भिवंडीत पॉवरलूम सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

भिवंडी :कोरोना, लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या कचाट्यात भिवंडीचा कापड उद्योग गेल्या दोन महिन्यांपासून अडकून पडला आहे. पाॅवर लूम बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेल्या

भिवंडी :  कोरोना, लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या कचाट्यात भिवंडीचा कापड उद्योग गेल्या दोन महिन्यांपासून अडकून पडला आहे. पाॅवर लूम बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेल्या मजूरांची उपासमार होत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पाॅवर लूम पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे मजूर वर्ग पुन्हा आपल्या गावी परतू लागल्याने कापड व्यवसाय अजूनच नुकसानीत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून लवकरात लवकर लूम सुरु होणे गरजेचे असल्याने  आमदार रुपेश म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर लूम सुरु करण्यास परवानगी दिली जाईल असे पक्के आश्वासन दिले. आज भिवंडीतील यंत्रमाग उद्योग सुरू करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शासन आदेशानुसार दिले. त्यामुळे येत्या काही दिवसात यंत्रमाग कारखाने सुरू होणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी पत्रकारांना दिली.