भिवंडीतील पॉवरलूम कामगाराच्या खुनाचा उलगडा, सीसीटीव्हीत झालं कैद

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील कारीवली परिसरात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्यात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा दोन दिवसापूर्वी अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील कारीवली परिसरात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्यात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा दोन दिवसापूर्वी अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती.याबाबत भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून दोन आरोपीना अटक केली आहे मात्र एक आरोपी अध्याप फरार आहे.   

आसिफ इम्तियाज अन्सारी (वय २३ रा. रामनगर भिवंडी ) मोहम्मद अफजल  मोहम्मद अस्लम मन्सुरी (वय, २४ रा. फातमानगर भिवंडी ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार सलमान फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.  मयत अजित स्वयंकांत पटेल हा भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी पहाटेच्या सुमारास  कारीवली तलावमार्गे रस्त्याने हे मित्रा सोबत  पायी जात असताना मोटार सायकल वरून आलेल्या तीन लुटारुनी या तिघांना बेदम मारहाण केली.

यावेळी अजित याचे दोन्ही मित्र त्याला सोडून पळून गेले यावेळी  अजित याने जोरदार विरोध केला असता  लुटारूंनी त्याच्या पाठीत धारदार शास्त्राचे वर करून त्याची निर्धून पणे हत्या करून त्याच्याकडील ३ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन फरार झाले.या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन सखोल तपास केला असता रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून वरील दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली.

मात्र यातील एक आरोपी फरार आहे सदर आरोपींची पैशासाठी हि हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त केली असून या दोघांना  न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .अधिक तपास पोलिस निरीक्षक नरेश पवार (क्राईम ) हे करीत आहेत.