नाका कामगारांप्रमाणे रिक्षाचालकांनाही आर्थिक मदत द्या – प्रकाश पेणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

कल्याण : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बंद असल्याने आर्थिक संकट आले आहे. अशातच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना शासनातर्फे २ हजार रुपये आर्थिक सहाय्य

 कल्याण : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बंद असल्याने आर्थिक संकट आले आहे. अशातच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना शासनातर्फे २ हजार रुपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे सरकारने जाहीर केले असून त्याच धर्तीवर रिक्षा चालकांना देखील किमान ३ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच कल्याण शहरातील सुमारे ६५० रिक्षाचालकांना संघटनेच्या वतीने अन्नधान्याचे वितरण देखील आज करण्यात आले. 

जगभरात कोरोनो व्हायरसने हैदोस घातला आहे. देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोनो विषाणुचा पार्दुभाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व रिक्षा टॅक्सी वाहतूक बंद आहे. त्याचा फार मोठा परिणाम रिक्षा टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाह व दैनंदिन जीवनमानावर झालेला आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांप्रमाणे सद्यस्थितीत रिक्षा टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून बांधकाम कामगारांना शासनातर्फे २ हजार रुपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे सरकारने जाहीर केले असून त्याच धर्तीवर रिक्षा चालकांना देखील किमान ३ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याची मागणी  रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने शहरातील सुमारे ६५० रिक्षाचालकांना आज जीवनावश्यक अन्नधान्याचे वितरण केले.