school ground

डोंबिवलीतील नागरिकांना विरंगुळा म्हणून मोजक्या ठिकाणांपैकी एक म्हणून भागशाळा मैदानाचे नाव पश्चिम डोंबिवलीत नजरेसमोर येते. साडेनऊ हजार चौरस मीटर जागेवर भागशाळा मैदान बांधण्यात आले असून ते पूर्णपणे गोलाकार आहे.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) डोंबिवली विभागात वाढत असेलेल्या सिमेंटच्या जंगलात नागरिकांसाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मैदाने आहेत. त्या मैदानांचे पालकत्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांचाकडे असते. प्रशासनाच्या बेजाबदार कामकाजामुळे शहरातील एकूणच मैदानांची दुरावस्था झाली (condition of the only school ground) आहे. विशेष म्हणजे गेल्या सत्तर वर्षांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचालीस साक्षीदार असणाऱ्या भागशाळा मैदानाकडे होत असलेली डोळेझाक गरिबांचे तारणहार तथा मनसेचे संघटक प्रल्हाद म्हात्रे यांना स्वस्थ बसून देत नाही. म्हात्रे यांनी सोशल मिडिया माध्यमातून आणि पालिका प्रशासनास पत्रव्यवहार करून याबाबत जाब विचारला आहे. करदात्या नागरिकांना कमीतकमी शुद्ध हवा मिळण्यासाठी प्रशासनाने मैदानाकडे लक्ष द्या अशी विचारणा केली आहे.

डोंबिवलीतील नागरिकांना विरंगुळा म्हणून मोजक्या ठिकाणांपैकी एक म्हणून भागशाळा मैदानाचे नाव पश्चिम डोंबिवलीत नजरेसमोर येते. साडेनऊ हजार चौरस मीटर जागेवर भागशाळा मैदान बांधण्यात आले असून ते पूर्णपणे गोलाकार आहे. कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, योगवर्ग, लाफ्टर क्लब क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक कट्टाप्रेमी आदींची सतत लगबग मैदानावर असते. सध्या या मैदानवर धुळीचे साम्राज्य असल्याने सर्वांसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मैदानावरील सतत वाहणाऱ्या धुळीच्या लोटामुळे क्रीडाप्रेमी हैराण झाले आणि त्यांनी प्रल्हाद म्हात्रे यांना मनसेच्या माध्यमातून समस्या सोडविण्याची विनंती केली. दरम्यान गरिबांचे तारणहार, कैवारी अशी ओळख असणाऱ्या म्हात्रे यांनी भागशाळा मैदानाची पाहणी केली आणि त्यांना दिसून आलेली परिस्थिती अतिशय भयावह आणि आरोग्यावर घाला घालणारी असल्याने त्यांनी प्रथम सोशल मिडिया आणि नंतर पत्रव्यवहार करून भागशाळा मैदानाबाबतच्या समस्या समोर आणल्या आहेत.

म्हात्रे यांना पाहणी दरम्यान समजून आलेली परिस्थिती अतिशय क्लेशदायक अशी आहे त्यांनी याबाबत नवराष्ट्रशी बोलतांना सांगितले कि, भागशाळा मैदानावरील धूळ समस्या सोडविण्यासाठी पाणी मारले जाते यासाठी पंप व्यवस्था करण्यात आली असली तरी ती पूर्णपणे ठप्प आहे. पंपरूम पूर्णपणे ढासळली आहे. तेथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. मोडकळीस आलेल्या पंपरूम मध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकीट थोटक, लाईट नसल्याने काळोख आहे. पंपरूम मधील मीटरबॉक्स जळला असून मीटर जागेवर नाही.

अशा परिस्थितीमुळे मैदानावर धुळीचे लोट उडत असून मैदानात येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चालण्यासाठी ट्रक आहे पण त्याची स्थितीही वाईट आहे. त्यामुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारी मंडळी आता मैदानाबाहेरील रस्त्यावरून चालतात. पण वाहनांमुळे रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने भागशाळा मैदानाचा उपयोग घेता येत नाही. मुळात या सर्व गोष्टीकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे गरजेचे आहे पण तसे होत नाही याचे वाईट वाटते असेही म्हात्रे यांनी सांगितले.

याबाबत डोंबिवली पश्चिम ह प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, गार्डन व्यवस्थाप्रमुख याकडे लक्ष देतात परंतु तरीही आम्ही पाहणी करून योग्य ती दखल घेवू. तर पालिका उपायुक्त संजय जाधव [उद्यान विभाग] यांनी सांगितले कि, ‘कोरोना’मुळे सर्व लक्ष देता आले नाही आता मैदाने आणि गार्डन मोकळ्या करून देखभाल काम सुरु झाली आहे. पण जर भागशाळा मैदानाबाबत गंभीर समस्या असतील तर आम्ही अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून योग्य ती दखल घेतली जाईल.