kushal badrike to tmc

कुशलचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी कुशलच्या तक्रारीची दखल घेत हा प्रश्न सोडवण्याचम अश्वासन दिले आहे. तसेच हा गंभीर प्रश्न निदर्शनास आणून दिल्याबद्दलही त्यंनी कुशलचे आभार मानले आहेत.

मुंबई : अभिनेता कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) नुकताच एका गंभीर समस्येसंदर्भात (complaint) व्हिडिओ (Video)  शेअर केला होता. कुशल बद्रिके राहत असलेल्या परिसरात घडणाऱ्या अत्यंत गंभीर अशा घटनेचा हा व्हिडिओ होता. याची प्रशासनाला दखल घेतली आहे.

कुशल ज्या परिसरात राहतो तिथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या संदर्भात कुशलने एक व्हिडिओ बनवून प्रशासनाला त्याची दखल घेण्यास सांगितले होते. कुशलचे घर ठाण्यातील सूरज वॉटर पार्क येथे आहे. घरासमोरील महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गावर फलक नसल्यामुळे अपघात होत आहेत असे कुशलने म्हटले होते. त्यामुळे महामार्गावर फलक लावण्यात यावेत अशी विनंती त्याने केली होती.


कुशलचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी कुशलच्या तक्रारीची दखल घेत हा प्रश्न सोडवण्याचम अश्वासन दिले आहे. तसेच हा गंभीर प्रश्न निदर्शनास आणून दिल्याबद्दलही त्यंनी कुशलचे आभार मानले आहेत.