kirit somayya letter to tahsildar

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांनी टिटवाळ्यातही ‘प्रताप’ केले असून सरनाईक आणि त्यांचा पार्टनर मोहित अग्रवाल यांनी एन.एस.सी.एल. घोटाळ्यातील (NSCL scam)२५० कोटी(250 crores) ढापून कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळ ७८ एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कल्याण : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांनी टिटवाळ्यातही ‘प्रताप’ केले असून सरनाईक आणि त्यांचा पार्टनर मोहित अग्रवाल यांनी एन.एस.सी.एल. घोटाळ्यातील (NSCL scam)२५० कोटी(250 crores) ढापून कल्याण(kalyan) तालुक्यातील टिटवाळा(titwala scam) जवळ ७८ एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

प्रताप सरनाईक व त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांनी ११२ जमीनींचे व्यवहार केले होते. या व्यवहारांचे पैसे प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांनी २०१२-१३ च्या एनएसईएलचा घोटाळ्यात २५० कोटी अफरातफर केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला आहे. हा प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा असून या प्रकरणी चौकशीची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. याबाबत सरनाईक यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी यासाठी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कल्याण तहसीलदारांना कागदपत्रे सादर करत निवेदन दिले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची लवकरच कसून चौकशी सुरू व्हावी यासाठी कल्याण तहसीलदार यांच्याकडे कागदपत्र जमा करून निवेदन दिले आहे आहे. २०१२-१३ च्या एनएसईएल घोटाळा दरम्यान डायव्हर्ट केलेल्या २५० कोटी रुपयांच्या पैशातून त्यांनी टिटवाळ्याच्या गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीवर ईडीची जप्ती आलेली असताना हे व्यवहार पुढे सुरुच ठेवले आहेत. प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटाळा समोर आला आहे. त्याचे कागदपत्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना सादर करुन चौकशीची मागणी केली आहे.

सरनाईक यांच्या कंपनीने यापूर्वी दोन घोटाळे केलेले आहेत. हे घोटाळे उघड केल्याने सोमय्या यांच्या विरोधात१०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. त्यावर सोमय्या यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हजार कोटी रुपयांचाही दावा त्यांनी माझ्या विरोधात करावा पण त्यांनी ठाण्यात बेकायदा दोन इमारती उभारल्या आहेत. त्याला ठाणे महापालिकेने ओसी दिलेली नसताना त्या इमारतीत नागरीक वास्तव्य करीत आहेत.

सरनाईक यांनी बेकायदा इमारती बांधून त्या सामान्य नागरीकांना विकून त्यांची फसवणूक केली आहे. आणि त्याच प्रकरणी उद्या किरीट सोमय्या हे ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या विरोधात फसवणुकीचा नागरिकांसोबत फ्रॉड केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.